Posts

Showing posts from April, 2012

बॉंम्ब

पत्रकाराने एका जखमीला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?" जखमी रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला........... "धप्पा"!!!!!!!!

बाकी

गुरुजी:- शरद, २५ भागिले 3 किती? शरद:- ८ गुरुजी:- बाकी काय? शरद:- बाकी मजेत!

लव लेटर

मुलगी : मी लग्न नाही करू शकत माझे लव लेटर दे दुसर्‍या दिवशी मुलाने लेटर बॉक्स आणला आणि म्हणाला........ "यातील तुझे लेटर निवडून घे आणि निघ"..........

दोन बायका

दोन बायका एका बस मधे जागेवरुन भांडत होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला," तुमच्या पैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल." आणि ती एक सीट रिकामीच राहिली

मराठी भाषा

मराठी भाषा फारच अवघड आहे ................ गाड़ी बिघडली असेल तर म्हणतात गाड़ी " बंद " आहे . आणि ... पोरगी बिघडली असेल तर म्हणतात पोरगी " चालू " आहे .

गणित

माझा विषय गणित.मला एक भाजी आवडत नाही ती म्हणजे चूका(गणितातील चुका) व मला एक भाजी आवडते ती म्हणजे पालक (पालक आपल्या पाल्याची चौकशी करणारे)

एअर होस्टेस

एअर होस्टेस - सर काय आणु खायला तुम्हाला?? -- " पुरी भाजी ,खीर , वडे, कोशिंबीर ,ताक, कुरडाया पापड "!! एअर होस्टेस - सर , तुम्ही विमानात आलाय .. तुमच्या बापाच्या १३ व्या ला नाही...